
प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेता सत्यदिप मिश्रा समवेत आपली लग्नगाठ बांधली आहे. काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोज शेअर करत, तिने हि गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, ” आज सकाळी मी सागरासारख्या शांत प्रेमासोबत लग्न केले आहे. पुढील आयुष्य प्रेम, शांती, स्थैर्य व महत्वाचे म्हणजे चेहऱ्यावर हस घेऊन येणारे असेल. आपल आयुष्य सुंदर असणार आहे” असे लिहिले आहे. मसाबा गुप्ता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता व ज्येष्ठ क्रिकेटर विवियन रिचर्डस यांची मुलगी आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
मसाबा गुप्ता हे फॅशन इंडस्ट्रीत गाजलेले नाव आहे. अलिकडेच मसाबा मसाबा या नेटफ्लिक्स वरच्या वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नीना गुप्ता यांच्यासह असलेलं नातं व फॅशन इंडस्ट्रीतील मेहनतीवर आधारित मसाबा मसाबा सीरीज नेटफ्लिसवर बरीच चर्चेत आली होती.