नामांकित कॉलेजचा कला शाखेचा निकाल 100 टक्के, प्रथम वर्ष कला शाखेच्या प्रवेशात चढाओढ

कला शाखेचा निकाल यंदा तब्बल 6.18 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील नामांकित कॉलेजचा कला शाखेचा निकाल 99 ते 100 टक्के लागला असून बऱ्याच कॉलेजचा कला शाखेचा निकाल विज्ञान शाखेपेक्षा जास्त आहे. हे चित्र पाहता यंदा प्रथम वर्ष कला शाखेच्या प्रवेशातही चढाओढ दिसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहावीनंतर अनेक विद्यार्थी कला शाखेकडे वळताना दिसत आहेत. कला शाखेतून करीअरचे भरपूर असे पर्याय उपलब्ध असल्याने बारावीनंतर कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांना मागणी वाढली आहे. मुंबई विभागाचा कला शाखेचा निकाल 80.41 टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षी पेक्षा या निकालात यंदा वाढ झाली असून 37 हजार 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

इतर शाखांपेक्षा कला शाखेचा निकाल अधिक असणारी कॉलेज
के सी महाविद्यालय कला – 100%, वाणिज्य 99.63%
के जे सोमैया कला-  100%, वाणिज्य 99.47%
सेंट झेवियर कला- 99.71%, विज्ञान 98.52%
रूपारेल कला-  99.71 %, विज्ञान-95.68%
एसआयईएस कला- 99.03 %, विज्ञान-96.97%
स्वामी विवेकानंद कला- 98.52%, विज्ञान-98.28%
सोफिया कला- 97.18%,  विज्ञान-95.03%
विल्सन कला- 97.08%,  विज्ञान-95.08%

कला शाखेतून करीअरचे जागतिक पर्याय
बारावीनंतर कला शाखेतून करीअरचे जागतिक स्तरापर्यंतचे पर्याय विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कला शाखेकडे वळणाऱ्या विद्याथ्र्यांची संख्या वाढत आहे, असे ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. सायन्स शाखेतून शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. तसेच कॉमर्समधून नोकरीचा सुरक्षित पर्याय मिळण्याची शक्यता कमी असल्याने कला शाखेकडे ओढा वाढत आहे, असेही ते म्हणाले.

कला शाखेचा 90 टक्क्यांपेक्षा जास्त निकाल देणारी कॉलेज
मिठीबाई – 99.56
केळकर –  98.79
रुईया – 97.14
सोमैया विनय मंदिर – 93.47
एनकेटी , ठाणे – 93.38
जोशी-बेडेकर, ठाणे – 92.11
खालसा – 91.45
नॅशनल – 90.91
एन् एल् (मालाड) – 90.14
भवन्स – 90.12
विकास (विक्रोळी) – 90.00
बिर्ला (कल्याण)- 89.91

आपली प्रतिक्रिया द्या