प्रसिद्ध हॉकीपटू मनदीप सिंहला कोरोनाची लागण

497

हिंदुस्थानी हॉकी संघाचा खेळाडू मनदीप सिंह याला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. कोरोनाचे संक्रमण झालेल्या तो सहावा हॉकीपटू ठरला आहे.

भारतीय खेळ प्राधिकरण (साई)ने याबाबत माहिती दिली आहे. येत्या 20 ऑगस्टपासून बेंगळुरू येथे साईच्या मैदानांवर हॉकीचे राष्ट्रीय शिबीर सुरू होणार होतं. तत्पूर्वी 21 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. आणि त्यात मनदीप सिंह याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

त्याच्यासह अन्य पाच खेळाडूंवर बेंगळुरू येथे उपचार सुरू आहेत. मनदीपआधी हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंह, डिफेंडर सुरेंदर कुमार, जसकरन सिंह, ड्रॅगफ्लिकर वरुण कुमार आणि गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक हे खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. या सर्वांमध्ये अतिसौम्य लक्षणं दिसत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हे खेळाडू बेंगळुरू येथेच अडकून पडले होते. महिन्याचा ब्रेक घेऊन ते पुन्हा या शिबिरात दाखल होणार होते. मात्र, तत्पूर्वी कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या