हॉट फोटोवर चाहता वैतागला म्हणाला तुमच्यावर केसच करतो, हिनानं दिलं उत्तर

hina-khan

टिव्ही अभिनेत्री हिना खान अनेकदा चर्चेत असते. तिचे फोटोशूटही चर्चेत असतात. ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली होती. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या या अभिनेत्रीच्या विरोधात तिचा एक चाहता तक्रार दाखल करण्यास जाणार आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

हिना खान बऱ्याचदा बिकिनी, ब्रालेट आणि बॉडीकॉन ड्रेसमधील तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या अदा आणि तिची फॅशन चाहत्यांना आवडते, तिचं खूप कौतुकही होतं. हिना फॅशन आणि स्टाइलमध्ये खूप पुढे आहे. सोशल मीडियावर तिनं Ask Me Anything सेशन ठेवलं आहे, ज्याद्वारे चाहते तिला प्रश्न विचारतात.

या प्रश्नोत्तरांमध्येच एका चाहत्यानं हिनाच्या हॉटनेसबद्दल असं काही लिहिलं आहे की ती स्वत: देखील हसू लागली आहे. चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘ मी तुमच्याविरुद्ध केस करेन की इतक्या उकाड्यात तुमचा हॉट अंदाज आम्हाला मारून टाकेल.’ त्यावर हिना खानने हसत हसत उत्तर दिलं – ‘कर दीजिए’.

हिना खानने काही दिवसांपूर्वीच मालदिव वेकेशनचे फोटो पोस्ट केले होते. फोटोमध्ये तिने रंगबिरंगी मोनोकोनी घातलेली दिसते. हिना डोळ्यावर गॉगल लावून पूलमध्ये रिलॅक्स असल्याचं दिसत आहे. तिच्या रुपावर अनेक प्रतिक्रिया आल्या.

हिनाच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेने नुकतीच 12 वर्ष पूर्ण केली. याकरिता तिनेसर्वांचे आभार मानले. लोकांमुळे मी या शोसोबत कायमीची जोडली गेली, घरोघरी पोहोचली. जे प्रेम, सकारात्मक दृष्टी आणि प्रेरणा मला अने लोकांकडून मिळाली आहे, असं तिनं आपल्या पस्टमध्ये नमूद केलं आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है सोबतच खतों तिन कसोटी जिंदगी की 2 मध्ये काम केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या