विश्वविजयानंतर कपडे उतरवले; नेटकरी म्हणतात, ही तर इंग्लंडची पूनम पांडे

232

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडने पहिल्यांदाच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशाच एका क्रीडाप्रेमीने इंग्लंडचा विजय अनोख्या अंदाजात साजरा केला. ट्विटर अकाऊंटवरून बेथनी लीली या मॉडेल आणि क्रिकेट चाहतीने आपले बोल्ड फोटो अपलोड केले.

बेथनी ही वेबकॅमची प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने इंग्लंडच्या विजयाचा आनंद लुटण्यासाठी आपले काही खास बोल्ड अंदाजातील फोटो ट्विटरवर पोस्ट केले. #CricketWorldCup2019 हा हॅशटॅग वापरून तिने फोटो पोस्ट केली आहे. तसेच वेल डन इंग्लैंड! असे कॅप्शनही तिने दिले आहे. हे फोटो हिंदुस्थानी चाहत्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तिला इंग्लंडची पूनम पांडे म्हटले आहे.

2011 च्या आयसीसी वर्ल्डकपदरम्यान हिंदुस्थानचा संघ जिंकल्यास मी न्यूड होईल असे पूनम पांडे हिने जाहीर केले होते. यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. तसेच काहींनी तिला ट्रोल केले आणि धमकीही दिली. त्यामुळे तिला माघार घ्यावी लागली होती.

आपली प्रतिक्रिया द्या