एटीएम पोहोचणार शेतकऱ्याच्या दारात

आता शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही. कारण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोबाईल एटीएम व्हॅन सुरू केली आहे. बँकेने प्रत्येक तालुक्यात एटीएम मोबाईल व्हॅन सुरू करावी असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्ड आर्थिक साक्षरता निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते.

सामंत पुढे म्हणाले की,जिल्हा मध्यवर्ती बँकेने खूप चांगले काम केले आहे. म्हणूनच राज्यातील एक अग्रेसर बँक ठरली असून त्याचे श्रेय बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांना जाते.आज कोकणात कर्ज बुडविण्याची प्रवृत्ती नाही. कारण जिल्ह्यातील कर्जमाफीचा आकडा फक्त १०० कोटी रूपये आहे.इतर जिल्ह्यात कर्जमाफीचा आकडा तुलनेने अधिक आहे.काही लोकांची कर्ज घेऊन बुडवण्याची प्रवृत्ती असते अशा लोकांना वठणीवर आणून कर्जवसूलीचे काम जिल्हा बँकेने केले असल्याचे सामंत यांनी सांगितले.उच्च व तंत्रशिक्षण खाते माझ््याकडे आहे.

पुढील वर्षापासून सहकार हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेणार आहोत असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.तसेच सहकार क्षेत्रात निवडणूका नकोत सहकारात राजकारण नको असे स्पष्ट मत सामंत यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने, बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, नाबार्डच्या अधिकारी श्रध्दा हाजरनीस, उपनिबंधक अशोक गार्डी, संचालक सुनील गुरव उपस्थित होते.

लॉकडाऊननंतर २४ कोटीची वसुली

लॉकडाऊनच्या काळात क़र्ज वसुली करू नका असा सरकारने आदेश काढल्यानंतर आमच्या एनपीएमध्ये वाढ झाली.हा वाढलेला एनपीए आम्हाला परवडणारा नव्हता.त्यामुळे आमच्या कर्मचा?्यांनी जीवाचे रान करून २४ कोटी रूपयांची वसुली केली असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.एटीएम मोबाईल व्हॅन हि बाजार,धार्मिक कार्यक्रम,यात्रा अशा गर्दीच्या ठिकाणी उपल्बध होईल.दुर्गम भागात ज्या ठिकाणी एटीएम सेवा नाही अशा गावात हि मोबाईल व्हॅन पोहचेल आणि सेवा देईल असे डॉ.चोरगे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या