सुरगाण्यात शेतकऱ्याची जाळून घेत आत्महत्या

16

सामना प्रतिनिधी । नाशिक

सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

भगवान नानू गावीत (४५) या शेतकऱ्याने आज पहाटे हनुमंतपाडा येथे पवार यांच्या शेतात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेतले. हे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्यांचे भाऊ गोपाळ यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गावीत यांच्या वडिलांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साडेतीन लाखांचे, तसेच ट्रक्टरचे ३ लाख ३९ हजार ३३४ रुपयांचे कर्ज असून, स्वतःच्या नावावर पंजाब नॅशनल बँकेचे ३० हजार ७०० रुपयांचे कर्ज आहे. ट्रक्टरचे कर्ज फेडण्याची नोटीस आल्याने ते तणावाखाली होते.

आपली प्रतिक्रिया द्या