कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

15

सामना ऑनलाईन, यावल

तालुक्यातील शिरसाड येथील एकनाथ रामदास चऱ्हाटे ( ४५) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून गावाजवळ असलेल्या हतनूर पाटाच्या पाण्याच्या चारीत उडी मारून आत्महत्या केल़ी

तालुक्यातील शिरसाड येथील शेतकरी एकनाथ रामदास चऱ्हाटे यांची एकत्रित कुटुंबाची १० बिघे शेतजमीन आहे. या शेतीवर विकास सोसायटी व अन्य दोन पतसंस्थांचा तीन लाखांचा बोजा होता. सततच्या नापिकीमुळे व शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्याने चऱ्हाटे यांना नैराश्य आले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. शेतात जातो असे सांगून चऱ्हाटे आज घरातून निघाले. गाकाजवळ असलेल्या हतनूर पाटाच्या चारीजवळ जाऊन त्यांनी पाण्यात उडी मारली. दोन दिवसांपासून हतनूर चारीला पाणी सुटलेले असल्याने चारीत खोल पाणी आहे. पाण्यात चऱ्हाटे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चऱ्हाटे यांचे भाऊ रघुनाथ चऱ्हाटे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या