पंढरपुरात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपुरातील माळशिरस गावात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल लोखंडे (५८) असं मृत शेतकऱ्यांच नाव आहे. शेतामध्ये काम करत असताना लोखंडे यांचा मृत्यू झाला आहे.

विठ्ठल लोखंडे शेतात मका काढण्याचे काम करीत होते. मका तोडत असताना उन्हाची झळ बसल्याने लोखंडे शेतात चक्कर येऊन पडले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. विठ्ठल लोखंडे यांच्या कुटुंबीयांना आपत्तीकालीन योजनेतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरपंच आप्पासाहेब लोखंडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या