पाथरीत कर्जासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

17

सामना प्रतिनिधी । पाथरी

कर्ज भेटत नसल्याने बँकेसमोर बुधवार 12 डिसेंबरपासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याला ह्रदयविकाराचा जोरदार झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमधून बँक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मागील अनेक दिवसा पासून भाकपाच्या नेतृत्वात शेतकरी पिककर्जासाठी स्टेटबँक ऑफ इंडीया समोर उपोषण आणि विविध आंदोलने करत होते, प्रत्येक वेळी बँक अधिकाऱ्यांनी आश्वासनावर बोळवन केल्याने 12 डिसेंबर रोजी पुन्हा भाकपाच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते दरम्यान 13 डिसेंबर रोजी दुपारी तुकाराम वैजनाथराव काळे (42) या मरडसगाव ता. पाथरी येथील शेतकऱ्याला ह्रदयचा त्रास जाणवू लागला. त्याला तात्काळ दवाखान्यात हलवले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला मानवत येथील शासकिय रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्याची प्राणज्योत मावळली.

आपली प्रतिक्रिया द्या