बँकेच्या रांगेत पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू

35

सामना ऑनलाईन, नागपूर

नोटाबंदीने त्रस्त शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा अजून संपण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी रांगा कायम असल्याचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे.यवतमाळ जिह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील स्टेट बँकेबाहेर देखील अशीच रांग होती. या रांगेत उभ्या असलेल्या भाऊराव पाईकराव (वय ६७) या शेतकऱयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

भाऊराव पाईकराव यांचे ढाणकी येथील स्टेट बँक शाखेत जनधन खाते होते. पैश्याची गरज असल्याने ते बँकेत गेले होते. मात्र, बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने त्यांना रांगेत बराच काळ ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भोवळ आल्याने ते खाली कोसळले. रांगेतील नागरिकांनी पाईकराव यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण भागात आजही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांगेत तास न तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे

 

आपली प्रतिक्रिया द्या