यू ट्यूबचे व्हिडीओ बघून घरातच केली गांजाची शेती, माहूलगावातून शेतकर्‍याला अटक

1109

आधुनिक पद्धतीने घरात गांजाची शेती करून त्याची विक्री करणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी निखिल शर्माला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने यू ट्यूबवर आधुनिक गांजाच्या शेतीचे व्हिडीओ पाहिले होते.

माहुल गावात कॉलेजच्या मुलांना गांजा विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती युनिट-3 च्या अधिकार्‍यांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी शहनिशा केली. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या पथकातील नितीन पाटील, सोनाली भारते, यांच्या पथकाने तपास सुरू केला. शनिवारी पोलिसांनी सापळा रचून निखिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो गांजा आणि 54 ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची किंमत 2 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. निखिलविरोधात पोलिसांनी ‘एनडीपीएस’ कायद्याखाली गुन्हा दाखल केला व त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. निखिल हा सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉलेजच्या मुलांना गांजा विकत असायचा. गेल्या वर्षभरापासून तो घरात गांजाचे उत्पादन घेत होता.

गांजाच्या शेतीचे धडे

निखिलने एमटेकपर्यंत शिक्षण केले आहे. त्याला गांजाचे व्यसन जडले होते. रोज गांजा विकत घेणे शक्य नसल्याने त्याने यू ट्यूबवर आधुनिक गांजा शेतीचा व्हिडीओ पहिला. शेतीसाठी लागणारे सामान चीनमधून तर गांजाच्या बिया नेदरलॅण्डमधून मागवल्या होत्या. त्याने माहुल येथील एका झोपडीत ग्रो सिस्टमने गांजा उत्पादन करण्यास सुरुवात केली. एलईडी लाइटस्, टायमर यंत्रणा, पीएच सॉइल टेस्टर, आर्द्रता मापक, पेपर टॉवेल पोलिसांनी जप्त केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या