कुस्तीपटूंचा गंगेत पदके विसर्जनाचा निर्णय तूर्तास टळला

केंद्र सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टिमेटम

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट हे ऑलिम्पियन कुस्तीपटू हरिद्वार येथील गंगा नदीच्या किनाऱयावर आपली पदके विसर्जित करण्यासाठी दाखल झाले होते, मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी खेळाडूंची समजून काढून त्यांचे मन वळविले. त्यामुळे कुस्तीपटूंची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास टळला आहे. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे या कुस्तीपटूंनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पैलवानांसोबत चर्चेनंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला कारवाईसाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. टिकैत यांनी कुस्तीपटूंकडून पदकांची बॅगही स्वतःकडे घेतली आहे. ही बॅग आपण राष्ट्रपतींना देणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. त्यानंतर सर्व खेळाडू हरिद्वारहून घरी रवाना झाले आहेत.

पदकांना कवटाळून रडले कुस्तीपटू

देशासाठी मिळविलेली पदके हरिद्वारच्या गंगेत विसर्जित करण्यासाठी गेल्यानंतर ऑलिम्पियन कुस्तीपटू त्या पदकांना कवटाळून ढसाढसा रडले. जी पदके जिंकण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तीच पदकं नाइलाजाने गंगेत विसर्जित करण्याची वेळ आल्याने या कुस्तीपटूंना हुंदके अन् अश्रू आवरता आले नाही. ते गंगाकिनारी तासभर रडत बसले होते. जणू एखाद्या सांत्वन सभेसारखं या ठिकाणी वातावरण तयार झालं आहे.

आमरण उपोषणाचा इशारा

गंगा नदीत पदके विसर्जित केल्यानंतर आमच्या आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटूंनी दिली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर युद्धात भारतीय सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलं होतं. आम्ही त्यांच्याइतके महान नाही, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावनादेखील त्या सैनिकांप्रमाणेच होती, अशी प्रतिक्रियादेखील कुस्तीपटूंनी दिली.

श्रीगंगा सभेचा पदके विसर्जित करण्यास विरोध

गंगा हे श्रीक्षेत्र आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असे आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केले आहे. सर्व खेळ हे अमर असतात आणि पदकांना अस्थी समजून विसर्जित करू नका, असेही नितीन गौतम यांनी म्हटले आहे. गंगेच्या तीरावर पूजा केली तरी चालेल, पण असे प्रकार करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. गंगेत पदके प्रवाहित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्रीगंगा सभेने विरोध केला आहे.

आम्ही पदक का कमावले?

विनेश फोगाटने ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात विनेशने म्हटले आहे की, 28 मे रोजी आमच्यासोबत झालेला प्रकार सर्वांनी पाहिला. त्यानंतर या देशात आमच्यासाठी काहीच राहिलं नाही. आजही आम्हाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आम्ही देशासाठी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियशनशिप पदक कमावले. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर आता आम्हाला वाटतं, आम्ही ही पदकं का कमावली? आम्हाला देशात इतकी वाईट वागणूक मिळत असेल तर या पदकांचा तरी काय उपयोग? म्हणून हताश होऊन आम्ही सर्व पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या हुकूमशाही राजकटीचा धिक्कार असो आदित्य ठाकरे यांचा संताप

खेळाच्या माध्यमातून जगभरात हिंदुस्थानची मान गौरकाने उंचाकणाऱया खेळाडूंसोबत दिल्लीत जे घडले ते निंदनीय आहे. शांततामय मार्गाने किरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱया आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आकाज दाबणाऱया हुकूमशाही राजकटीचा धिक्कार असो, अशा शब्दांत शिकसेना (उद्धक बाळासाहेब ठाकरे) नेते, युकासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैलकानांचे आंदोलन चिरडणाऱया केंद्रातील भाजप सरकारकिरोधात संताप क्यक्त केला. देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या तरुण खेळाडूंच्या पाठी ठाम उभे राहायला हके आणि न्यायाची मागणी करायला हकी, असे आकाहनही आदित्य ठाकरे यांनी ट्किटरच्या माध्यमातून केले.