नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना ऑनलाईन, नाशिक / सटाणा

रविवारच्या अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने सटाणा तालुक्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविले, तसेच आठवडाभरात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून निफाड तालुक्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात दोन महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सटाणा तालुक्यातील कंधाणे गावी राहत्या घरी नितीन कडू बिरारी (२५) यांनी १ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच तालुक्यातील करंजाड येथील सुनील शांताराम देवरे (२७) यांनी मंगळवारी घरी वीष प्राशन करून जीवन संपविले. निफाड तालुक्यात चार आत्महत्या झाल्या. करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण (४३) यांनी २७ एप्रिलला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गाजरवाडीतील अश्विनी संदीप गाजरे (३२) यांनी धारणगाव वीर येथे वडिलांच्या घरी २६ एप्रिलला वीष प्राशन करून आत्महत्या केली. उगाव येथील शंकर सखाराम जगताप (५२) यांनी सोमवारी, १ मे रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. पिंपळगाव-बसवंत गावातील सागर सुदाम जाधव (३०) यांनी आज सकाळी दहा वाजता टोलनाक्याजवळील कादवा नदीपात्रात उडी घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या