जालना कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर येथील शेतकरी शिवाजी आसाराम काळे (40) यांनी कर्जाचा डोंगर व अतिवृष्टीमुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे विषारी द्रव्य प्रशान करून आपली जीवनयात्रा संपवली.

सोमवारी शिवाजी काळे यांनी घरच्यांना मी शेतात जाऊन येतो असे सांगत ते घरातून निघाले. जाताना त्यांनी बाजारातून आणलेले विषारी द्रव्य घेतले. यावेळी शेतात कोणीच नसल्याने जागीच मृत्यू झाला. काही जणांनी शेताकडे जात असताना शिवाजी काळे यांना बघितले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते शेताकडून घरी परतले नसल्याने जवळच्या नात्यातील लोकांनी शेतात जाऊन पाहिले असता शिवाजी काळे खाली कोसळलेले दिसून आले व तोंडातून फेस येत होता. 6.30 च्या सुमारास अबंड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. संध्याकाळी शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा १० वाजता शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा,पत्नी,आई असा परिवार आहे. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३० हजार, महिंद्रा फायनान्स कंपनीचे 1 लाख, बचत गट यासह उसनवारीचे घेतलेले पैसे असा कर्जाचा डोंगर झाल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचे मयत शिवाजी काळे यांच्या नातेवाईकांने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या