कळवणमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

18

सामना प्रतिनिधी । नाशिक

कळवण तालुक्यातील आठंबे येथे ५२वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (५२) यांनी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पाटील कांतीलाल गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीवरुन कळवण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

बंगाळ यांच्या वडिलांच्या नावे आठंबे शिवारात दीड एकर शेतजमीन आहे. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी ते बांधकाम मजूर म्हणूनही काम करीत होते.

आपली प्रतिक्रिया द्या