
कर्नाटकातील बंगळुरु शहरातील प्रसिद्ध जीटी मॉलवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. एका शेतकऱ्याला धोतर घातले म्हणून मॉलमध्ये प्रवेश न दिल्याने सिद्धारमैया सरकारने मॉलला सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटकातील बंगळुरु शहरातील प्रसिद्ध जीटी मॉलमध्ये बुधवारी एका शेतकऱ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्याने धोतर घातले म्हणून त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला होताो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशस मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. यावरुन कर्नाटक विधानसभा सत्रातही हा मुद्दा मांडण्यात आला. कर्नाटकचे नगर विकास मंत्री बिरथी सुरेश यांनी मॉल प्रबंधकाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
गुरुवारी कर्नाटक विधानसभेत बिरथी सुरेश यांनी सांगितले की, मी याप्रकरणी बंगळुरु महानगर पालिकेला त्या मॉलविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारने तो मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.