शेतशिवारातील कष्टकरी महिलांनी गीतातून केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक

2080

कोरोनाशी धैर्याने मुकाबला करत राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शेतशिवाऱातील कष्टकरी महिलांनाही कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांनी संवादातून महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील लोकांची मने जिंकली आहेत. कोल्हापूरच्या गारगोटी शिवारातील शेतकरी भगिनींनी आपल्या सरळ साध्या बोलीभाषेतील गाण्यातून ‘उद्धव ठाकऱ्यानं आधार दिला…’ असे म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कशी काळाची चाहुल झाली, कसा कोरोना रोग हा आला

मोदी सरकारनं लॉकडाऊन केलं, उद्धव ठाकऱ्यानं आधार दिला

तुम्ही तोंडाला मास्क बांधा, सॅनिटायझरनं हात धुवा

तुम्ही घरात सुरक्षित राव्हा, तुम्ही घरात, घरात, घरात सुरक्षित राव्हा

असे बोलीभाषेतील गीत महिला म्हणत असून कोरोनाबाबत जनजागृतीही करीत आहेत. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार युद्धपातळीवर अहोरात्र लढा देत आहे. आता तर शिवारात राबणाऱ्या बळीराजाच्या तोंडीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुणगान आपसुकच होऊ लागले आहे. माय-माऊली भले ती शिक्षित नाही, तरीही कोरोना महामारीत आपले निखळ व भाबडे मत बोलीगीतातून व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधार दिल्याचे सांगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या