औसा चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

63

सामना प्रतिनिधी । लातूर

शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची शासनाची मानसिकताच नाही. त्यामुळेच आवश्यक तेवढ्या बारदानाच्या गोणी उपलब्ध करुन देण्यात येत नाही. पर्यायाने तूर खरेदी संथ गतीने झाल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने औसा येथील चौरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

औसा येथील तूर खरेदी केंद्रावर मागील चार दिवसांपासून तूरची खरेदी बंद आहे. तूर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेकडो शेतकऱ्यांनी आपली तूर खरेदी केंद्रावर आणलेली आहे. जवळपास १५० वाहनांमधून ही तूर शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेली आहे. परंतु तूरीची खरेदी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.

शासनाने सर्व तूर खरेदी करावी, या मागणीसाठी औसा येथील चौरस्त्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात राजेंद्र मोरे, गणेश माडजे, दत्ता गुंजोटे, दत्तू टिपे यांच्यासह अन्य शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झालेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या