farmers bill : इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर पेटवला; उत्तर हिंदुस्थानात शेतकरी रस्त्यावर, कर्नाटकात बंद

farmer-bill-protest

देशात शेतकरी विधेयकावरून रान पेटलं आहे. संतप्त शेतकरी सरकारच्या निर्णयावरून आंदोलन करण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात विविध राज्यात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारसमोर मागण्या ठेवत आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलन छेडले आहे. दिल्लीत राजपथावर आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. काही अज्ञातांनी एक ट्रॅक्टर इंडिया गेटच्या जवळ आणला. तिथेच आंदोलन केले आणि नंतर ट्रॅक्टर पोटवून दिला आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान ट्रॅक्टर पेटवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा बंदची हाक दिली आहे. शेतकरी विधेयकाच्या मंजूरी विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात शेतकरी आंदोलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या