बँकेचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने काढली तीन मुले विक्रीला, पैशाअभावी मुलीचे शिक्षणही थांबवले

30

सामना ऑनलाईन, बुलढाणा

शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कुऱहा येथील राजू नाकाडे या शेतकऱ्याने आपली तीन मुले विक्रीला काढली आहेत. बँकेच्या तगाद्याला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून कळवले आहे.

खामगाव तालुक्यातील कुऱहा येथील राजू रामभाऊ नाकाडे यांना पाच एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीसाठी त्यांनी पत्नी शारदा यांच्या नावाने इको बँकेकडून सवा लाखाचे कर्ज घेतले होते. नापिकी, दुष्काळामुळे नाकाडे हे कर्ज फेडू शकले नाहीत. आता व्याजासह ही रक्कम दोन लाख रुपये झाली आहे. त्यांनी स्वतःच्या नावावरही ९० हजारांचे दोन वेळा व एकदा दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. आता हा आकडा व्याजासह चार लाखांवर गेला आहे. पिकांच्या भरवशावर त्यांनी हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेतला. परंतु तीन वर्षे शेतात काहीच झाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या राजू नाकाडे यांनी त्यांची तिन्ही मुले विक्रीला काढली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या