कंपनीविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने

21

सामना ऑनलाईन | धुळे

साक्री तालुक्यातील भामेर येथील शेतकऱयांनी जमीन हडप करणाऱया कंपनीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करताना भविष्यात या शेतकऱयांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. वीज निर्माण करण्यासाठी गुजरात येथील खासगी कंपनीने दिशाभूल करीत जमीन संपादित केली. या फसवणुकीसाठी गावातीलच मनोज काशीराम सोनवणे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

साक्री तालुक्यातील भामेर येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी अहमदाबाद येथील सर्जन रिऑलिटीज गेलफार्म या कंपनीने जमीन मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकऱयांनी जमीन देण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱयांनी मनोज सोनवणे आणि जयदेव बेहरे यांना सोबत घेऊन त्यांना शेतकऱयांचा विश्वास संपादन करण्यास सांगितले. सौरऊर्जेसाठी जितकी जमीन लागे, त्याचा समाधानकारक मोबदला दिला जाईल, असे सांगून फसवणूक केली.

आपली प्रतिक्रिया द्या