उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० शेतकऱ्यांचा लाखाचा विमा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने तालुक्यातील १०० शेतकऱ्यांचा एक लाखाचा विमा उतरविण्याचा निश्चय करण्यात आला त्याची सुरूवात आजपासुन करण्यात आली.

शेतकऱ्याला शेती करतेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणुन शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यासाठी विमा उतरविण्याचा एक चांगला उपक्रम घेण्याचे ठरले. आज सकाळी शिवसेना ‘शिवनेरी’ पक्ष कार्यालयामध्ये तालुक्यातील १०० शेतकऱ्यांचा विमा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरविण्यात आला. त्याचे वाटप बालाजी मुळे, साधू थावरे, मारूती मुळे, प्रल्हाद कदम, तुकाराम कदम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना करण्यात आला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख भारत सांगवीकर, माजी तालुका संघटक अनिकेत फुलारी, नगरसेवक संदीप चौधरी, बालाजी आगलावे, भाऊसाहेब मुळे, सुभाष गुंडीले, सर्कल प्रमुख माऊली देवकत्ते, शाखाप्रमुख श्रीराम कदम, मनोज चामे, दत्ता कदम, जगन्नाथ पडीले, लक्ष्मण कदम यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या