मोठी बातमी – दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही कर्जमाफीची योजना आणणार!

1533
ajit-pawar

शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत असलेल्या कर्जाची माफी दिल्यानंतर आता दोन लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देण्यात येणार असुन, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही सरकारकडुन सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. नवीन अर्थिक वर्षात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने जाहीर केलेली मराठवाडा वाटरग्रीड योजना अर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले असल्याने ही योजना तपासली जाणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात वाटरग्रीडसाठी कुठलीही तरतुद केली जाणार नसल्याचे स्पष्ट करतांना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, ही योजना करण्याबाबतची परिस्थिती असल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात यासाठी तरतुद करता येईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या