नांदगावला शेतकऱ्याची विद्युत तारेचा शॉक घेऊन आत्महत्या

17

सामना ऑनलाईन, नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विद्युत प्रवाहाची वायर हातात धरून शॉक घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तुकाराम रंगनाथ सोनवणे असे त्यांचे नाव असून मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली.

सोनवणे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया व खासगी असे सुमारे १२ लाखांचे कर्ज होते. नापिकी व कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या