चक्रीवादळाच्या प्रभावाने बळीराजा चिंतेत, कापूस, तूर पिक संकटात

फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने धानाचे पूंजने वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव झाली होती. सद्या शेतात कापूस, तुर, हरबरा,पिक उभे आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट ओढवले, तुरीला फुलोरा आला आहे. पावसामुळे फुलोरा गळण्याचा धोका उदभवाला असून अळीचा धोका वाढला आहे. मोठा पाऊस झाला तर कापूस काळा पडण्याचा धोका निर्माण आहे, एकीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी स्थिती तर दुसरीकडे अस्मानी संकट. या दोन्ही संकटाचा सामना करताना बळीराजा हतबल झाला आहे. पावसापासून धानाचे पुंजने वाचवण्यासाठी बळीराजा रात्र जागून काढत आहे. कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांचा शोधात बळीराजा गावोगावी भटकताना दिसत आहे.