कश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी तत्कालीन राज्यपाल जगमोहन जबाबदार- फारुक अब्दुल्ला

2157

कश्मिरातून पंडितांच्या पलायनासाठी तत्कालीन राज्यपाल जगमोहन हेच जबाबदार आहेत. तीन महिन्यात घरवापसी करण्याचा खोटा वायदा करून जगमोहन यांनी पंडितांना खोऱ्यातून बाहेर नेले, असा खळबळजनक आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी केला आहे. पंडितांना सन्मानपूर्वक कश्मिरात परत आणण्याच्या प्रक्रियेचे आपण समर्थन करू असेही त्यांनी म्हटले.

जम्मू-कश्मिरातून कलम ३७० हटवण्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने आयोजित एका वेबिनारमध्ये बोलताना डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी कश्मिरी पंडितांच्या पलायनाला तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांना जबाबदार ठरवले. कश्मिरी मुसलमानांनी पंडितांना हुसकावून लावले नाही, असा दावा करतानाच त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीत सगळे सत्य समोर येईल असेही ते म्हणाले. अजूनही अनेक कश्मिरी पंडित येथेच आहेत, त्यांनी आपले घर सोडले नाही. पंडितांशिवाय कश्मीर अधुरे आहे. जोपर्यंत कश्मिरी पंडित खोऱ्यात परत येत नाहीत तोपर्यंत ही अपूर्णता कायम राहिल असे डॉ. फारुक अब्दुल्ला म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या