फारूख अब्दुल्ला मोदींपेक्षाही जास्त ‘राष्ट्रवादी’, भाजपच्या माजी मंत्र्यांचा टोला

1225

माजी अर्थ आणि विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेचा आसूड ओढला आहे. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला हे तुलनेने पंतप्रधान मोदींपेक्षाही जास्त राष्ट्रवादी आहेत, असे यशवंत सिन्हा म्हणाले. सोशल मीडियावर ट्वीट करून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून फारूख अब्दुल्ला यांना त्यांच्या घरात नजरकैद करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत नजरकैदेत आहेत. यामध्ये आणखी 3 महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांना मोदी सरकारवर टिका केली. फारूख अब्दुल्ला यांना आणखी काही काळ नजरकैदेत राहावे लागणार आहे, ही मोठी खेदाची बाब आहे. अब्दुल्ला पंतप्रधान मोदींपेक्षाही राष्ट्रवादी आहेत, असे ट्वीट यशवंत सिन्हा यांनी केले.

20 मार्च, 2020 पर्यंत नजरकैद
फारूख अब्दुल्ला यांना जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून श्रीनगरच्या घरात नजरकैद ठेवण्यात आले आहे. या घराला उप-जेल घोषित करण्यात आले आहे. अब्दुल्ला यांची नजरकैद 14 मार्च, 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. फारूख अब्दुल्ला यांच्यासह मेहबुबा मुफ्ती यांना श्रीनगरमधील एका सरकारी भवनामध्ये ठेवण्यात आले आहे, तर ओमर अब्दुल्ला हरि निवासमध्ये नजरकैद आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या