जोरात पादल्याने 42 हजार रुपयांचा दंड, रक्कम न भरल्यास तुरुंगात जावे लागणार

या जगात चित्रविचित्र लोकं आहेत, ती काय करतील याचा कोणाला नेम नसतो. ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नामध्ये एक असाच विचित्र माणूस पोलिसांना सापडला आहे. या माणसाला पोलिसांनी दंड ठोठावला असून या घटनेची चर्चा जगभर झाली आहे.

5 जून रोजी व्हिएन्नाच्या बागेत पोलीस आणि या माणसामध्ये बाचाबाची झाली होती. याचा राग आल्याने तो माणूस अचानक बाकावर उभा राहिला आणि पोलिसांकडे पाठ फिरवून जोरात पादला. पोलिसांना हे अजिबात आवडलं नाही. सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे प्रकार केल्याबद्दल पोलिसांनी त्याला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्याला 500 युरोंचा म्हणजे जवळपास 42 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या माणसाने अजून दंड भरलेला नाही, तो भरला नाही तर त्याला 5 दिवस तुरुंगात जावं लागू शकतं. या घटनेची जगभरात चर्चा झाली असून तिथल्या पोलिसांनी एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की कोणालाही ‘चुकून’ झालेल्या घटनेसाठी दंड ठोठावलेला नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या