कोणत्या राशीसाठी हा आठवडा आहे त्रासदायक? वाचा साप्ताहीक राशीभविष्य

3654

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – मनाप्रमाणे घडेल
दुसऱयाचे मन दुखवू नका. शब्द जपून वापरा. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यामुळे कामे सुरळीत पार पडतील. छोटासा प्रवास घडेल. सोनेरी रंग जवळ बाळगा. ज्या कामासाठी जाल, त्यात यश मिळेल. साहित्यिकांसाठी मस्त आठवडा. गोष्टी मनाप्रमाणे घडतील.
शुभ परिधान – अष्टगंध, चांदीची अंगठी.

वृषभ – धाडसी निर्णय
रखडलेली कामे या आठवडय़ात उरकून घ्या. कुटुंबीयांना दुखवू नका. त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतील. घरातील पाठिंब्यावरच त्यात यशस्वी व्हाल. निळा रंग जवळ बाळगा. व्यवसायात जपून व्यवहार करा.
शुभ परिधान – रेशमी कुर्ता, शूज.

मिथुन – अनपेक्षित लाभ
प्रिय व्यक्तीला गृहित धरू नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. परक्या व्यक्तीचा तुमच्या व्यक्तिगत बाबीतील हस्तक्षेप टाळा. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सोनसाखळी, चमेलीची फुले.

कर्क – चांगले विचार
आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आठवडा. तुमची मुले तुम्हाला महत्त्वाच्या कामात मदत करतील. ती मदत खूप महत्त्वाची ठरेल. गुलाबाची ताजी फुले घरात ठेवा. सकारात्मक ऊर्जा खेळेल. लाल रंग महत्त्वाचा ठरेल. मनात चांगले विचार आणा.
शुभ परिधान – गुलाबाचे अत्तर, साडी.

सिंह – आवडीच्या गाठीभेटी
संध्याकाळ खूप प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्याल. विनाकारण कामाबाबत उदार धोरण स्वीकारू नका. जे ठरवले आहे, त्यावर ठाम रहा. पोपटी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – शहापुरी साडी, शर्ट.

कन्या – आठवणींना उजाळा
जुने मित्रमैत्रिणी भेटतील. गोड आठवणींना उजाळा मिळेल. या भेटीतून काही भविष्यकालीन योजना ठरतील. त्या खूप फायद्याच्या ठरतील. घरात थोडे बदल होतील, पण काळजी नको. सगळे स्थिरस्थावर होईल. चमकदार रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, तांब्याचे वळे.

तूळ – कर्तव्ये पार पाडाल
घराची कर्तव्ये यथायोग्य पार पाडाल, पण स्वतःकडे दुर्लक्ष नको. संतुलित आहार वेळेवर घेण्याची सवय लावा. प्रवास फायदेशीर ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. घरातील लहान मुलांबाबत सुवार्ता कानी येईल. चंदेरी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – भरजरी वस्त्र, कंगन.

वृश्चिक – मेजवानी मिळेल
जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे गुंतवणुकीत लाभ होईल. त्यातून भरगच्च आर्थिक लाभ होईल. शारीरिक श्रमाची कामे टाळा. सहकाऱयांचे सुख लाभेल. तब्येतीस जपा. गरम पदार्थांचे सेवन करा. घरात गुलछडीची फुले ठेवा. पांढरा रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – रुद्राक्ष, लिपस्टिक.

धनु – योजना साकारतील
आनंदाने परिपूर्ण आठवडा. घरातील लहान गोष्टीत आनंद शोधाल. लहानसहान कारणावरून होणारे वाद टाळा. मनातील योजना साकारतील. गणेशाचे पूजन करा. मनोकामना पूर्ण होतील. पिवळा रंग तुमच्या राशीसाठी नेहमीच फलदायी.
शुभ परिधान – कोल्हापुरी चप्पल, सुती झब्बा.

मकर – गुप्तता पाळा
खासगी आणि गोपनीय माहिती परक्या व्यक्तीसमोर कधी उघड होऊ देऊ नका. भावनिक व्हाल, पण काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील. घरातील व्यक्तींना तुमच्या मदतीची गरज भासेल. तुम्ही ती कराल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. राखाडी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – पैठणी, पारंपरिक पोशाख.

कुंभ – वरचढ रहाल
शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. त्यातून अनपेक्षित आर्थिक लाभ संभवतो. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाचा ताण असेल, पण तो जाणवणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमची बाजू वरचढ ठरेल. अबोली रंग परिधान करा.
शुभ परिधान – गरम कपडे, घडय़ाळ.

मीन – खंबीर राहा
संतुलित आहार आणि व्यायाम ही तुमची बलस्थाने आहेत. त्यात कमी पडू नका. ताणतणाव जाणवतील, पण खंबीरपणे तोंड द्या. त्यात यशस्वी व्हाल. मन सकारात्मक आणि स्थिर ठेवा. त्यातून योग्य निर्णय घ्याल. हिरवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – आवडते कपडे, सोन्याचा दागिना.

समस्या -माझा मुलगा दहा वर्षांचा आहे. रोज रात्री 2-3च्या मध्ये रडत उठतो, घाबरतो. – साधना लेले, मुंबई
तोडगा – रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याला समोर बसवून रामरक्षा म्हणा आणि त्याच्या उशाखाली तुलसीदल ठेवा.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या