
कोरोनाच्या महामारीमुळे संसर्गापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला खूप महत्त्व आले आहे. यातून प्रेरणा घेत एका महिला फॅशन डिझायनरने आगळावेगळा ड्रेस तयार केला असून त्याला सोशल डिस्टन्सिंग ड्रेस असे नाव दिले आहे. शाय असे या डिझायनरचे नाव असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ड्रेसचे फोटो अपलोड केले आहेत. पाहता पाहता तिचा या ड्रेसचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतायत
हा ड्रेस परिधान केलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची चिंता करण्याची गरज भासणार नाही. शाय यांना हा ड्रेस तयार करण्यासाठी 300 यार्ड म्हणजेच 270 मिटर्सपेक्षाही जास्त कापडाची गरज पडली. या ड्रेसची त्रिज्या ही सहा फूट इतकी आहे. जे अंतर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आदर्श समजले जाते. हा ड्रेस तयार करण्यासाठी त्यांना 2 महिन्यांचा कालावधी लागला. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांनी त्याकर मॅचिंग म्हणून फेस मास्कही बनकला आहे. सोशल मिडियावर अनेकांनी या भन्नाट कल्पनेचे कौतुक केले आहे.