स्टाईल : फॅशनेबल पाऊस

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर

चिंबचिंब भिजवून टाकणाऱ्या पावसात स्टायलिश, ट्रेंडी फॅशन करणे खूपच कठीणपण तरीही यामध्ये थोडीशी कल्पकता दाखविली तर स्टायलिश राहायला नक्कीच जमू शकेल.

रंगांची जादू

हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या अनेक गडद छटा असलेल्या कपडय़ांना पावसाळ्यात अधिक पसंती दिसून येते. यामध्येही हिरव्या रंगाच्या छटांना अधिक पसंती दिली जाते. डिझायनरचा आवडता ट्रेंड म्हणजे जांभळा, लेमन यलो आणि पांढरा शुभ्र आश्चर्य म्हणजे पावसाळ्यासाठी हे रंग अधिक उपयुक्त ठरतात. अर्थात, या गडद रंगांबरोबरच त्यातही गुलाबी, नारंगी आणि जांभळ्या रंगाच्या छटा फॅशन डिझायनरच्या पसंतीच्या असतात. पावसाळ्यासाठी रिंकल ग्रीन कपडय़ांचे आणि गडद काळ्या रंगांचे पोशाख खुलून दिसतात. रंगीबेरंगी पोशाख बरोबरच काळ्या रंगाच्या सीन अधिक उठून दिसतात. मुलांसाठी पावसाळी रंगांमध्ये ब्राऊन, ग्रे, ब्ल्यू यांच्या शेडस् आऊटफिटस् चांगले दिसू शकतात. पावसाळ्यात बरेच कपडे खराब होतात, त्यामुळे पेस्टल शेडस् किंवा लाईट शेडस् टाळणे योग्य आहे. याबरोबरच डार्कशेडस्मध्ये ऑलिव्हग्रीन. चेरी रेड, नेव्ही ब्ल्यू, मरून या रंगांचा वापर करावा.

डिझायनर फूटवेअर

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शूज वापरल्यामुळे फंगल इनफेक्शन होण्याची अधिक भीती असते. म्हणून या दिवसांत शक्यतो रबर आणि प्लॅस्टिकच्या रेनी फूटवेअर वापरणे अधिक चांगले आहे. स्टायलिश आणि कंफर्टेबल असे रेनी फुटवेअर वापरण्याला युवकांची पसंती आहे. फूटवेअरमध्ये तरुणांसाठी वेगळा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. मनमुराद भिजण्याचा आनंद घेताना शॉर्टच्या सोबतीला वॉटरप्रूफ व प्लॅस्टिकच्या स्लिपर्स आणि शूज आहेत. फ्लिप-फ्लॉप स्लिपर्स आणि वॉटरप्रूफ शूज हे लूक स्टायलिश रूप देतात. विविध रंग आणि डिझाईन यामध्ये पाहायला मिळतात. सध्याच्या सीझनमध्ये वॉटरप्रूफ आणि ईझिली वॉशेबल बेलीला पसंती मिळत आहे. गमबूट, रबरी स्नीकर्स, क्रॉक्स स्टाइल शूज, फ्लिप-फ्लॉप चप्पल, सँडल आदी विविध प्रकार चप्पलमध्ये आहेत.

आऊटफिटस्

पावसाळ्यासाठी नेहमीच गडद रंग उत्तम.  शक्यतो पावसाळ्यात सफेद, क्रीम अशा लाइट शेड्स वापरणे टाळावे, कारण या भिजल्यावर पारदर्शक दिसतात. प्रिंटस्मध्ये कलरफुल प्रिंटस्, फ्लोरल, भौमितिक आकारांचे प्रिंटस् यांचा मिलाफ योग्य ठरेल. पावसाळ्यात नेहमी हलके कपडे वापरावे. शिफॉन, जॉर्जेट, मलमल या कापडांना प्राधान्य द्यावं, कारण हे भिजल्यावर लगेच सुकतात. अँकल लेंथ जेगिन्स, रीब्ड जीन्स, लूज शर्टस, स्ट्रेट कट ड्रेसेस, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट लेन्थ जीन्स, ऑफ शोल्डर्स टॉप, केप्रिज, अँकल लेंथ स्कर्टस् घालू शकता. तर कुर्तीजमध्ये स्ट्रेट एलाईनचा वापर करावा. युवकांसाठी बर्म्युडा,शॉर्ट जीन्स आणि थ्री-फोर्थचा चांगला पर्याय सध्या पाहायला मिळत आहे. याबरेबरच कॅज्युअल जॅकेट, डार्क कलरचे प्रिंटेड टी-शर्टचा हटके लूक पसंतीस पडत आहे. डेनिम शॉर्टस्, लूज टी शर्टस्, कॉटन शर्टस् वापरायला हरकत नाही. शक्यतो पेस्टल शेडस् कपडय़ांचा वापर करावा.

स्टायलिश ऍक्सेसरीज

पावसात ऍक्सेसरीज् वापरताना शक्यतो जंक अन् फंकी ज्वेलरी वापरा. त्यामध्ये स्टाईल व कलरफुल असे इअररिंग्ज, नेकपीस, ब्रेसलेट, रिंग्ज वापरा. तरुणींनी पावसाळ्यात बॅग वापरताना शक्यतो त्या वॉटरप्रूफ अशाच वापराव्यात. कापडी किंवा चामडय़ाच्या बॅग्ज वापरू नयेत. काळा, पांढरा, ब्राऊन, पर्पल, निऑन या शेड्समधील नायलॉन आणि रेग्झिनच्या बॅगचा वापर करावा. तसेच स्पोर्टी लुक असणाऱ्या क्रॉस बॅग, सॅक्सदेखील मस्त वाटतील. सध्या रेनप्रूफ कलरफुल बेल्ट्स, बॅग्स, वॉचेस, मोबाइल कव्हर्सही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वॉटरप्रूफ बॅग्समध्ये ट्रांस्परंट, फ्लोरल प्रिंटस् किंवा कार्टून डिझाइन्स असलेल्या बॅग्जची चलती आहे. पेस्टल शेडस् बॅग्जचीदेखील चलती दिसून येत आहे. वॉटरप्रूफ क्लच पर्सही मार्केटमध्ये आल्या आहेत. ज्वेलरीमध्ये ओव्हरसाइज नेकपीस, इयरिंग्स, नोजरिंग, इयरकफ्स, चंकी बेल्टस वापरू शकता.

आकर्षक छत्र्या

निरनिराळे आकार आणि रंगसंगतींमुळे छत्र्या अधिक आकर्षक झाल्या आहेत. काही कल्पक कलावंतांनी छत्र्यांच्या कॅनव्हासवर छान चित्रे काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सध्या क्लासिक, फोल्डेबल, बबल, स्टॉर्म, ऑटोमॅटिक, गोल्फ अम्ब्रेला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कलर्सच्या असंख्य शेडस्  आणि स्टाइल्स यात आहेत. छत्र्यांमध्येही पोलका डॉट्स, फ्रिलच्या छत्र्यांबरोबर कार्टून्सच्या आणि रंगीबेरंगी फुले, चेक्स, टेडीज, हार्टची डिझाईन असणाऱ्या छत्र्या अजूनही लोकप्रिय आहेत. खास फ्रिल लावलेल्या, थ्री फोल्डेड आणि प्रिंटेड छत्र्यांना खूप पसंती मिळतेय. सध्या लाईटवेट छत्र्यांची मागणी असल्याने फायबर, पॉलिथीनचा वापर करण्यात आला आहे. निळा, हिरवा, लाल, पर्पल आणि निऑन रंगांच्या छत्र्यांनी बाजारपेठ सजली आहे.