FAशन PAशन

वंदना गुप्ते

 फॅशन म्हणजे स्टेटमेण्ट

व्यक्तिगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?- जे मला आवडतात आणि विशेष म्हणजे कम्फर्टेबल वाटतात अशाच कपडय़ांना प्राधान्य देते.

 फॅशन म्हणजे केवळ कपडे की?- पुन्हा स्टेटमेण्टच सांगेन.

आवडती हेअरस्टाईल?- मला शॉर्ट हेअर आवडतात. बहुतेकदा ते कसे ठेवावेत हे वातावरणावरही अवलंबून असतं.

फॅशन जुनी की नवी?-  मी करेन ती फॅशन असं मला तरी वाटतं. मला स्वतःला जे आवडतं ते घालते.

आवडता रंग? – रस्ट आणि मँगो कलर आवडतो. त्यामुळे नाटकात प्रत्येक सिनेमात मँगो कलर असतोच.

तुमच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते सलवार कमिझमध्ये आवडते. पण इव्हेंटमध्ये साडी नेसण्याला प्राधान्य देते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?- मुंबईत स्ट्रीट शॉपिंग नाही होत, पण  युरोपमध्ये करायला आवडते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता ?- कपडय़ांवर खूप करते.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?- आर्ट ज्वेलरी आवडते.

आवडता ब्रॅण्ड रोजच्या कॅज्युअलेससाठी ग्लोबल देसी आणि बिबा.

फॅशन फॉलो कशी करता?- मी फॉलो नाही करत, मला फॉलो करतात. माझी डिझायनर आहे शोभना दातार ती माझ्यासाठी साडी डिझाईन करते. बहुतेक इव्हेण्टच्या तिच्याचकडच्या साडय़ा असतात.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?- मला कोणतेही कपडे फेकून द्यायला आवडत नाही. अशावेळी मिक्स मॅच करून ते कपडे घालते. त्यामुळे मी  फॅशन संदर्भात कोणते नियम नाही पाळत. मनाला वाटेल ते मी घालते.

 ब्युटी सिक्रेटमी स्वतःची फार काळजी घेते. नेहमी रात्री झोपताना क्लिनिझिंग, मॉईश्चरायझिंग क्रीम लावते. विशेष म्हणजे सगळे हर्बल प्रोडक्ट वापरते.

टॅटू काढायला आवडतो का?- नाही, मला शरीरावर कायमस्वरुपी असे काहीच आवडत नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टीलहान कानातले, मोबाईल, लिटील मेकअप.

 फिटनेससाठी…चालणे आणि भरपूर पाणी पिणे