एकादशी स्पेशल :- शेंगदाण्याची आमटी

साहित्य – दीड कप शेंगदाण्याचे कुट, ३ कप पाणी, २ चमचे साखर, २-३ आमसुलं, अर्धा चमचा जीरे, २ हिरवी मिरची, ३ चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर, तूप फोडणीसाठी, मीठ चवीप्रमाणे

कृती – सर्वप्रथम शेंगदाण्याचे कुट पाण्यात एकजीव करून घ्या. त्यात साखर, आमसुलं, ओले खोबरे, मीठ, आणि कोथिंबीर घालून आमटी उकळून घ्या.
फोडणीपात्रात तूप गरम करून त्यात मिरची घाला. त्यानंतर त्यात जिरे घालून आमटीला फोडणी द्या. झटपट उपवासाची शेंगदाण्याची आमटी तयार.

आपली प्रतिक्रिया द्या