अमेय वाघ सांगणार ‘फास्टर फेणे’ची गोष्ट!

’फास्टर फेणे’ ही मराठीतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कादंबऱयांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन भा.रा. भागवत यांनी केले आहे. ही मालिका बनेश फेणे या साहशी मुलाच्या आयुष्यात घडणाऱया रहस्यमय, अद्भुत साहशी प्रसंगांवर आधारित आहे. या मालिकेत एकूण 20 पुस्तके असून आता ही ओरिजनल पुस्तके ऑडिओ फॉरमॅटमध्ये ‘स्टोरीटेल’कर छोटय़ा दोस्तांसाठी उपलब्ध असणार आहेत. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ‘फास्टर फेणे’चे नवीन ऑडिओबुक ‘स्टोरीटेल’वर अभिनेता अमेय वाघच्या आवाजात ऐकता येणार आहे. 1987मध्ये दूरदर्शनवर ‘फास्टर फेणे’च्या कथांवर आधारित मालिका सादर करण्यात आली होती. यात सुमित राघवनने फास्टर फेणेची भूमिका तर नुकत्याच येऊन गेलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटात अमेय वाघने फेणेची भूमिका केली होती. आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका बालदोस्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या