केडगाव येथील वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांच्या कुटुंबीयांचे उपोषण मागे

44

केडगाव येथे मागील चार दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील व उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते लिम्बू पाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, गणेश कवडे, योगीराज गाडे, सारिका भुतकर, आशा निबाळकर आदी उपस्थित होते.

नगर शहरातील केडगाव उपनगरात ७ एप्रिल रोजी संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांची निघृर्णपणे हत्या करण्यात आली होती. या दोघांच्या हत्येआधी आणि नंतर नगर शहराशी संबंधित असणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांचे हत्याकांडाशी संबंधित असणाऱ्यांशी व फिर्यादीत नावे दिलेल्यांशी सलगी असल्याचा आरोप कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केला होता. कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यावर आम्ही कारवाई करण्याची मागणी केली होती, तेव्हा तशी कारवाई केली. मात्र त्याचवेळी अक्षय शिंदे यांच्यावर कारवाईचे आश्वासन देऊन देखील कारवाई न करण्यात आल्याने कुटुंबीय नाराज आहे. त्यामुळे तशी कारवाई करण्याची विनंती करणारे पत्र कुटुंबीयांनी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना पाठवले आणि कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

कोतवाली पोलीस अधीक्षकांना हटवल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा केडगाव येथील वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील यांनी त्वरीत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या