१ डिसेंबरपासून नव्या गाडय़ांसाठी फास्टटॅग सक्तीचे

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

येत्या १ डिसेंबरपासून विक्री करण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याची जबाबदार वाहन निर्मिती कंपन्या आणि अधिकृत वितरक यांच्यावर टाकण्यात आली आहे. दरम्यान फास्टटॅगमुळे टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगा कमी होतील आणि लोकांच्या वेळेचीही बचत होणार आहे.

फास्ट टॅगची गाडी टोलनाक्यावर येताच त्या ठिकाणी असलेले सेन्सर टॅगवरील कोडनंबर टिपेल. टोलनाक्यावर थांबून डेबीट, क्रेडीट कार्डसारखे हे टॅग मशीनवर स्वॅप करण्याची गरज नाही. त्यामुळे फास्टटॅग लावलेली गाडी लवकर टोलनाक्यावरून पुढे जाईल.

इतर गाडय़ांनाही सक्ती होणार
सध्या फास्टटॅग ऐच्छीक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांचा अल्प प्रतिसाद आहे. परंतु लवकरच सर्व चारचाकी वाहनांना फास्टटॅगची सक्ती होणार आहे. त्यासाठी काही बँका आणि टोलनाक्यांवरून फास्टटॅग खरेदी करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या