मुलीला पोहायला शिकवत असताना बाप लेकीचा बुडून मृत्यू

1252

मुलीला शेतातील शेततळ्यात पोहणे शिकवत असताना पाण्यात बुडून बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथे मंगळवारी २६ मे रोजी दुपारी घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की,अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील शिवसिंग मन्साराम बहुरे(३८) व त्यांची मुलगी आरती शिवसिंग बहुरे( १४) आपल्या गट नंबर २३ मधील शेतातील शेततळ्यात मुलीला पोहणे शिकवत होते.यासाठी एक दोरीचा व कॅनीचा आधार घेतला होता. परंतु आरतीच्या हातातील दोरी सुटल्याने ती बुडू लागली तेव्हा शिवाजी बहुरे हे तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना तिने त्यांना पकडले. त्यामुळे दोघेही बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसिंग यांच्या पश्चात आई वडील पत्नी,तीन भाऊ,एक मुलगा असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या