अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड

2028

धाराशिव येथे होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्य मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

जानेवारी – 2020 मध्ये धाराशिव येथे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज रविवार, 22 सप्टेंबर रोजी शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्य मंहामंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो याचं नाव सुचवलं. फादर फ्रन्सिस दिब्रिटो यांची यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या