मेहंदी सुकण्याआधीच बापाने केला मुलीचा कुर्‍हाडीने निर्घृण खून

39

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

आई वडिलांचा विरोध झुगारून गावातील तरुणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं पित्यानं पोटच्या पोरीचा निर्घृण खून केला आहे. पित्यानं मुलीच्या घरात घुसून तिच्यावर कुऱ्हाडीनं तब्बल वीस वार केले. खून केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाणे गाठत खुनाची कबुली दिली आहे.

मलकापूर तालुक्यातील निमखेड गावातील एकवीस वर्षीय तरुणीचे आईवडिलांनी लग्न ठरविले होते. आई वडिलांचा विरोध झुगारून मनिषाने निमखेड गावातीलच घरासमोरील गणेश गजानन हिंगणे (२२) या युवकाशी प्रेमविवाह केला. सुखी संसाराची स्वप्ने पाहत गावातच संसार थाटला. मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात झालेल्या बदनामीचा राग मनात धरून बापाने मुलीच्या घरात घुसून कुर्‍हाडीने तब्बल वीस वार केले. निर्घृण खून केल्यानंतर सरळ बोराखेडी पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या