मुलाने घेतलेल्या कर्जापायी वडीलांचा जीव गेला; सावकाराच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

13
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, नागपूर

एका तरूणाला उधारीने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी सावकाराने कर्जदाराच्या ६५ वर्षांच्या वडीलांना आणि आईला लाथाबुक्क्यांनी तुडवत जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीमध्ये तुळसीराम डबले यांचा मृत्यू झाला आहे. ६ जुलै रोजी धीरज गजभिये या सावकाराने डबलेंना मारहाण केली होती. डबलेंचा मुलगा राकेश याने गजभियेकडून उधारीवर पैसे घेतले होते. पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. राकेशचं म्हणणं आहे की त्याने बरीचशी कर्जाची रक्कम परत केली आहे, मात्र गजभिये ते कबूल करायला तयार नाहीये. पैसे वसूल करण्यासाठी गजभिये राकेशच्या घरी गेला, तिथे त्याने साथीदारांसह राकेशच्या आईवडीलांना बेदम मारहाण केली

अजनी पोलिसांनी गजभियेविरोधात डबले यांच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. डबले यांच्या कुटुंबियांनी आधी देखील गजभियेविरोधात धमकावल्याची तक्रार केल्याचं म्हटलं आहे, मात्र पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने आपल्या वडीलांचा मृत्यू झाल्याचं डबलेंच्या मुलांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या