अंथरुणात लघूशंका केल्याने वडिलांनी दिले मुलीला चटके

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठ वर्षाच्या मुलीने अंथरुणात लघूशंका केली म्हणून तिच्या वडिलांनी तिला गरम चमच्याने चटके दिल्याची घटना घडली आहे. पी, राजू असं आरोपी पित्याचं नाव असून तो कॅब ड्रायव्हर आहे. हैद्राबादमधील एका सामाजिक संस्थेने याप्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने अंथरुणात लघूशंका केल्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी तिच्या शरिरावर गरम चमच्याचे चटके दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याआधीही हैदराबादमध्ये एका आईने शिक्षा म्हणून तिच्या चार वर्षांच्या मुलीला गरम तव्यावर बसायला लावलं होतं. या शिक्षेमुळे ही मुलगी गंभीररित्या भाजली होती.