दोन चिमुकल्यांसह पित्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

36
suicide

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहरातील लालबाग परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शहरातील हनुमान घाट परिसरातील असणाऱ्या विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्यात आली आहे.

मोलमजूरी करून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ऋषीबाबा तांबे यांनी आपली मुलगी प्रियंका (९) व मुलगा सागर (७) यांच्यासह आत्महत्या केली. बुधवारी दुपारच्या सुमारास तांबे यांनी विहिरीवर जाऊन पहिल्यांदा दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनास पाठवले आहे. मात्र आत्महत्येमागिल कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या