फॅशनेबल आजी-आजोबा

  • पूजा तावरे, फॅशन डिझायनर

पार्टी… 31st सेलिब्रेशन… विवाह सोहळे… एक ना अनेक निमित्त… आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळीनी फॅशनेबल होण्याचे!

जच्या काळातही सर्वच बाबतीत सल्ले देणाऱ्या ग्रॅनी-गॅन्डपाच्या आऊटफिट्सबद्दल जजमेंटल झालात तरं नवलं वाटून घेऊ नका. सध्या आजी आजोबांच्या फॅशन्स, विविध रंग, स्टाइल्स, ज्वेलरी, हेअरस्टाइल, मेकअपमधून व्यक्त होत आहेत.

सध्याच्या फॅशन युगात बदलत्या ट्रेंडनुसार प्रत्येक वयोगटातील कपड्यांची फॅशन बदलत चालली आहे. तरुण-तरुणींबरोबरच आजी-आजोबांच्या फॅशनमध्ये देखील बदल दिसून येत आहे. यामध्ये लेदरमधील कोणतीही गोष्ट प्रत्येकाला आवडतच असते. हिवाळी ऋतूमध्ये थंडीपासून संरक्षणाबरोबरच एक फॅशन म्हणून देखील लेदर जॅकेटला आजी-आजोबांकडून पसंती मिळत आहे. सध्याचा पार्टी, समारंभाच्या सीझनकरिता विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे पाहायला मिळतात. आजोबादेखील या प्रिंटेड पोलो शर्टचा वापर करताना दिसून येतात. जुनेपणाला आधुनिक टच देत बाजारात अनेक प्रकारचे मफलर आले आहेत. याची देखील क्रेझ सध्या आजी-आजोबांच्या वापरात दिसून येत आहे.

कुर्ता खास हिंदुस्थानी पेहराव असल्याने बदलत्या काळातही त्याची लोकप्रियता टिकून आहे. बाजारपेठेत सॅटिन, कॉटन मिक्स, टेरिकॉट, शिफॉन या प्रकारांतील कुर्ते उपलब्ध आहेत. मात्र, सर्वाधिक मागणी कॉटन कुर्त्याला आहे. विवाह समारंभाची जागा, स्टाईल यानुसार आजकाल आजी आजोबा फॅशन करताना दिसतात. उन्हाळयात विवाह समारंभ असल्यास लीननच्या सुटला, हिवाळ्यात जोधपुरी, थ्री पीस सूट ला मागणी दिसून येते. भरजरी जॅकेट्स, नक्षीदार शॉल्स, श्रग सेट अशा प्रकारच्या आऊटफिट्सना अधिक मागणी दिसून येते. आजकाल सण-समारंभापासून ते अगदी सेलिब्रेशन पाटर्य़ांपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कारणासांठी आजी साड्यांमध्ये मिरवणं पसंत करताना दिसतात.

विवाह समारंभासाठी बदलती फॅशन
तुमच्या कुटुंबातील विवाह समारंभाकरिता सगळेच जण आता विविध पोशाखांमध्ये सजताना दिसतात. वर-वधू आणि त्या दोघांचे आई वडील खास पोशाखात मिरवताना दिसतात मग अशा वेळी आजी आजोबा मागे कसे राहतील. किंबहुना आजी आजोबा इतरांपेक्षा खास दिसावेत असाच त्यांचा पोशाख असाल पाहिजे.

इंडो वेस्टर्नची फॅशन
सध्या इंडो वेस्टर्नची चलती असून तरूणांबरोबरच आजोबादेखील इंडो वेस्टर्न ट्राय करताना दिसतात. यंदा खास फेस्टिव्हल सिझनसाठी बाजारात बॉलिवूड स्टाईल फेस्टिव्ह लुकपासून ते थेट पारंपारिक पोशाखासह पुरूषांच्या कलेक्शनवर वेगवेगळे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये नेहरू जॅकेटला अधिक पसंती मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रिटेंड, शॉर्ट असे नेहरू जॅकेटस् प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ही जॅकेटस् स्ट्रेट पॅण्टवर सहज वापरता येतात. सध्या नेहरू जॅकेटसोबत पटियाला, धोती पँट घालायचा ट्रेंड आहे.