अरुण गवळीच्या मुलीचे अभिनेत्याशी लग्न होणार, कोण आहे हा अभिनेता वाचा सविस्तर

4120

स्वराज्याच्या इतिहासातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत फत्तेशिकस्त हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चांगला गाजलाही. दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील एका कलाकाराचे गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची मुलगी योगिता गवळीसोबत विवाह होणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडाही पार पडला.

‘पुणे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडीची मुलगी योगिता गवळी हिचा नुकताच अक्षय वाघमारेशी साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा समारंभ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह एका हॉटेलमध्ये पार पडला. योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी हजेरी लावली होती.

पाच वर्षापासून ओळख

क्षय आणि योगिता गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला होता. ‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. जेव्हा आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाह बंधनात अडकण्याचा सल्ला दिला तेव्हा आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे ही आनंदी आहोत’ असे अक्षय प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अक्षयच्या कामाचे कौतुक

अक्षय वाघमारे याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले असून नुकताच आलेल्या ‘फत्तेशिकस्त’मधील त्याच्या कामाचे कौतुक झाले. अक्षयने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’ या मराठी चित्रपटांत काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या