‘फत्तेशिकस्त’ला शिवकालीन संगीताचा साज

741

‘फत्तेशिकस्त’मध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱया दिग्पाल लांजेकरने या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला आहे. ‘रणी फडकती लाखो झेंडे’… हे एक भव्यदिव्य गाणे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या या गाण्यात 200 नर्तक, मावळातील 1000 कार्यकर्ते, 200 ढोलवादक आणि 200 ध्वजधारकांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला आहे.

कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी या गाण्याचे अप्रतिम नृत्य दिग्दर्शन केले आहे. ‘रणी फडकती…’ची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणे सिनेमातील सर्व कलाकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. माऊलींच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे आहे त्या अवधूत गांधी यांच्या स्वरातील ‘हेचि येळ देवा नका’… हे गीतही लक्षवेधी ठरणारे आहे. ‘स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइक’ असे वर्णन केला जाणाऱया ‘फत्तेशिकस्त’ 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या