एफडीएची शाळा कॉलेजच्या कॅण्टीनवर नजर

36

सामना प्रतिनिधी । मुंबई

शाळा-कॉलेजच्या कॅण्टीनवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाची नजर असून कॅण्टीनमध्ये कोणत्या प्रकारचे पौष्टीक अन्नपदार्थ ठेवावेत याविषयी आता एफडीए मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. एफडीएने ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’ मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत आता हेल्दी मेन्यूचे धडे मुख्याध्यापकांना मिळणार आहेत.

सुरुवातीला ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’ या मोहिमेंतर्गत कॅण्टीनमधील अन्नपदार्थ कसे असावेत, याबाबत सर्व शाळा आणि कॉलेजसाठी नियमावली जारी करण्यात आली होती. आता या अन्नपदार्थांमध्ये कोणत्या प्रकारचे पौष्टिक घटक असाकेत, याबाबत शाळा-कॉलजेच्या मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे पालक आपल्या मुलांना घरून जेवणाचा डबा न देता कॅण्टीनमध्ये काहीतरी खाण्यासाठी पैसे देतात. मुलेदेखील कँटिनमधील तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लहान वयातच मुलांना लठ्ठपणा, मधुमेह, हायपरटेंशन असे आजार बळाकतात. हे टाळण्यासाठी एफडीएने शाळा-कॉलेजच्या कॅण्टीनवर नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली आहे.

ठाण्यातील मुख्याध्यापकांची 18 जुलैला बैठक
एफडीएने ठाण्यातील 100 शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांची 18 जुलैला बैठक बोलाकली आहे. शाळा-कॉलेजच्या कॅण्टीनमधील अन्नपदार्थांमध्ये कोणत्या प्रकारचे पौष्टिक घटक असावेत, याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. या बैठकीत आहारतज्ञ, न्यूट्रिशियन यांनाही बोलावण्यात आले आहे.

शालेय मुलांमध्ये लठ्ठपणा आणि विविध आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी एफडीएने ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत शाळांमधील कॅण्टीनसाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारची नियमावली तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. – पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

आपली प्रतिक्रिया द्या