तुम्हाला माहिती आहे काय आहेत नोकिया नव्या 3310 चे फिचर्स?

47

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

एका जमान्यात नोकिया कंपनीने मोबाईलच्या दुनियेत ३३१० हा मॉडेल आणून क्रांती घडवली. टिकाऊपणा, अधिक क्षमतेची बॅटरी यामुळे या मोबाईलची प्रचंड विक्री झाली. नोकियाचा हाच मोबाईल पुन्हा येणार आहे हे जरी आपल्या सर्वांना माहीत असले तरी आता याच मोबाईलचे फिचर्स आणि किंमतही लीक झाली आहे. मोबाईलच्या स्पर्धेत हिंदुस्थानात मागे पडलेल्या नोकियाने आता पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे ठरविले आहे. यासाठीच लोकप्रियता मिळविलेले ३३१० हे मॉडेल पुन्हा बाजारात आणले जाणार आहे. नोकियाचा मालकीहक्क असलेली एचएमडी ग्लोबल ही कंपनी २०१७ मध्ये हा मोबाईल लाँच करणार आहे. विशेष म्हणजे नोकिया आता अँण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहे.

  • या मोबाईलमध्ये अँण्ड्रॉइड सिस्टिम नसेल
  • नवीन ३३१० ची किंमत सुमारे ४ हजार १५० रुपये असेल
  • मोनोक्रोम ८४ X ८४ डिस्प्लेच्या जागी कलर स्क्रीन
  • स्मार्टफोन नाही तर हा फिचर फोन असेल
  • लाल, हिरवा, पिवळा अशा अनेक रंगामध्ये उपलब्ध
  • जुन्या मोबाईलपेक्षा वजनाने हलका असणार
  • बॅटरीची क्षमता पूर्वीप्रमाणेच असेल.
आपली प्रतिक्रिया द्या