ऍक्ट्रेक कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर लोकाधिकार समितीचे वर्चस्व

टाटा हॉस्पिटल, ऍक्ट्रेक खारघर येथील ऍक्ट्रेक कर्मचारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्थानीय लोकाधिकार समितीच्या ऍक्ट्रेक सोसायटी 2023-28 पॅनेलने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळविले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, खासदार, पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्या पाठिंब्याने लोकाधिकार समितीने हे यश मिळविले आहे. स्थानीय लोकाधिकार समिती, ऍक्ट्रेक युनिटचे कार्याध्यक्ष रवींद्र पवार, सरचिटणीस मनीष डोळस यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या निवडणुकीत सर्व मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत विजय मिळवून दिला.

रवींद्र पवार, मनीष डोळस, कमलेश इसरानी, प्रवीण मोरजकर, मीनल शिरसाट, ज्योत्स्ना देसेकर, शशिकांत अहिरे, निखिल चौधरी, भारत खाडे हे उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. या उमेदवारांचे युनिट अध्यक्ष तुकाराम गवळी, सरचिटणीस नंदकिशोर कासकर यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत समितीचे पदाधिकारी श्यामल वेताळे, मदन बरकुमे, युवराज निकम, मधुसूदन शिवानंदम, अजय साळवे, जयराज कासले, रवींद्र पाडळे, अभिजित जमधाडे, मकरंद जगताप, सुनील खैरनार, अजय मिश्रा, नरेश देसेकर, महादेव डोंगरे, आदित्य नाथगोसावी, रामचंद्र भोगले, गणेश गुरव, अजय भोईर, शरद म्हात्रे यांनी या निवडणुकीत मेहनत घेतली.