नामीबियाहून चार महिन्यांपूर्वी आणलेल्या मादी चित्ता sashaची प्रकृती चिंताजनक; किडणी संसर्गाने त्रस्त

कुनो नॅशनल पार्कमधील एक मादी चित्ता आजारी आहे, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्त्याचे नाव Sasha आहे. गेल्या काही दिवसांपासू ही चित्ता थकलेली दिसत होती. तसेच ती अशक्त जाणवत होती. त्यामुळे तिची तपासणी करण्यासाठी भोपाळहून पशुतज्ज्ञांना बोलावण्यात आले. तिल किडणीला संसर्ग झाला असून तिच्या शरीराचे डिहायड्रेशन झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. भोपाळहून आलेले तज्ज्ञ तिच्यावर उपचार करत आहेत. इतर चित्ते तंदुरुस्त असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

या चित्त्यावर उपचारासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. Sasha च्या किडणीला संक्रमण झाल्याने बिघडली आहे. अशा प्रकारचा संसर्ग सामान्य नसून अशा संसर्गात चित्त्याचे शरीरातील काही अवयव काम करणे थांबवतात. त्यामुळे सध्या Sashaची प्रकृती चिंताजनक आहे. तिला द्रव पदार्थावर ठेवले तरी तिची प्रकृती सुधारण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाच वर्षांची ही मादी नामीबियातील गोबाबिस येथे 2017 मध्ये सापडली होती. त्यावेळी ती अशक्त आणि कुपोषित होती. गावकऱ्यांनी तिला सोबत आणले आणि तिची काळजी घेतली. त्यानंतर 2018 मध्ये नामीबियातील चिता कंजरवेशन फंडकडे सोपवण्यात आले.

या ठिकाणी तिची योग्य ती काळजी घेण्यात आली. त्यानंतर हिंदुस्थानात पाठवण्यात येणाऱ्या 8 चित्त्य़ांमध्ये तिचा समावेश होता. गेल्या चार महिन्यांपासून तिची तब्येत चंगली होती. मात्र, चार दिवसांपासून इतर चित्त्यांच्या तुलनेत ती थकलेली आणि अशक्त वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांना तपासणीसाठी बोलावण्यात आले. तिच्या उपचाराबाबत नामीबियातील चिता कंजरवेशन फंडचाही सल्ला घेण्यात येत आहे.